Posts

Showing posts from May, 2023

'जैत रे जैत'मधला नाग्या, ढोल आणि चिंधी❤️

'जैत रे जैत'मधला नाग्या ढोल वाजवायचा. नाग्या हा ठाकरवाडीचा भगत. लिंगोबाच्या डोंगराला जी पोळ्यांची माळ आहे तिथे राणी माशीचं वास्तव्य आहे. तिला जर बघायचं असेल तर खूप पुण्यवान व्हावं लागेल, असं नाग्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं. नाग्या आपल्या पित्याच्या सांगण्यानुसार पुण्यवान होण्याच्या दिशेला जात होता. तो कधीच कुणाच्या अध्यात-मध्यात नसायचा. त्याने तर आयुष्यात मांसाहारही खाल्लं नाही. तो खूप भोळा आणि भला होता. पण तरीही नाग्याच्या वडिलांना सापाने डसलं आणि जीव घेतला. नाग्यावर मधमाशांनी हल्ला केला आणि त्याचा एक डोळा फुटला. नाग्या सारख्या भल्या माणसाच्या नशिबात हे भोग आले. नाग्या या घटनांमुळे पुरता खचला.  या काळात नाग्याच्या प्रेयसीने त्याला सच्ची साथ दिली. त्याची प्रेयसी म्हणजे चिंधी. तिच्या बापाने पैसे आणि बाटलीच्या मोहापाई दारूड्याशी लग्न लावून दिलेलं. पण चिंधीला ते आवडलं नाही. चिंधीने जीव ओतून पैसे गोळा केले आणि सासरवाडीच्या लोकांना पै पै परत केले. लग्न मोडलं. तिचं नाग्या या गावाच्या भगतावर जीव होता. पण ती विवाहित असल्याने नाग्याने तिला नकार दिला होता. नंतर चिंधीने नाग्याच्य...